प्रत्येक उत्तर लिहिताना शेवटचे अक्षर "ळी" आले पाहिजे.
1 हाताचे शेवटचे बोट -
2. एक कडधान्य -
3.फणसातील बी -
4 कृत्रिम दात -
5. केरळमध्ये राहणारा माणूस -
6 पावसाचे पाणी पत्र्यावरून
खाली पडते -
7 प्राण्यांचे नाव -
8 आचमनासाठी वस्तू -
9 फाल्गुन महिन्यातील सण -
10 वाळलेली केळी -
11 सरळ नाक असलेल्या स्त्रीच्या नाकाची उपमा -
12 रामदास स्वामींच्या खांद्याला असते ती -
13 सकाळी म्हणायचे भजन -
14 दोन्ही हातांनी वाजवतो ती -
15 भाजी चिरायचे साधन -
16 नारळाच्या झाडाची फांदी -
17 पायच्या बोटातील दागिना -
18 एक रंग -
19 संतांच्या हातातील वाद्य -
20 महाराष्ट्रातील एक जात -
21 डॉक्टरांचे औषध -
22 लहान लाकडे एकत्र बांधून केलेली -
23 पुरात न मोडणारे -
24 तीन ठिकाणची केलेली
यात्रा -
25 फुल उमलण्यापूर्वीची
अवस्था-
26 अनेक डाळींच्या पिठाचा घावन
27 श्रीखंड बासुंदीत शोभेसाठी घालतात -
28 गव्हाच्या पिठाची करतात ती-
29 पेशव्यांच्या कानातील दागिना -
30 मदतीसाठी मोठय्याने मारतात ती-
31 सण समारंभात दारात काढतो ती -
32 पूरण घालून करतो ती-
33 दिवाळीतील तिखट पदार्थ -
34 दूध घालतो ती -
35 बागकाम करणारा -
36 दिव्यांचा सण -
37 झाडाची पाने खाते ती -
38 संक्रातीला या रंगाची साडी नेसतात -
39 गालावर पडते ती -
40 प्रतिस्पर्ध्याची मात –
उत्तरे -1) करंगळी 2) चवळी 3)
आठळी 4) कवळी 5) केरळी 6) पन्हाळी 7) शेळी
8) पळी 9) होळी 10) सुकेळी 11) चाफेकळी 12) झोळी 13)भूपाळी 14) टाळी
15) विळी 16 )झावळी 17) मासोळी 18) शेवाळी 19) चिपळी 20) कोळी 21)
गोळी
22)मोळी 23) लव्हाळी 24) त्रिस्थळी 25)कळी 26)आंबोळी 27) चारोळी 28)पोळी
29) बाळी 30)आरोळी 31) रांगोळी 32) पुरणपोळी 33)कडबोळी 34)गवळी
35) माळी 36)दिवाळी 37) अळी 38)काळी 39) खळी 40) खेळी