सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

कूटप्रश्न

 

                      कूटप्रश्न  

* एका पिशवीत 14 सोडून सर्व निळे ,21 सोडून सर्व काळे, 18 सोडून सर्व लाल ,13 सोडून सर्व पिवळे चेंडू असतील तर त्या पिशवीत एकूण चेंडू किती आहेत ?

    स्पष्टीकरण-   

चेंडूची  संख्या=  14+21+18+13 = 66

  चेंडूचे प्रकार = 4 -1 = 3 ( निळे ,काळे,लाल , पिवळे )

एकूण चेंडू = 66 ÷3

         = 22

 

*एका शेतात 14 सोडून सर्व म्हैस , 20 सोडून सर्व शेळ्या , 12 सोडून सर्व गाय आहेत जर त्या शेतात तीनच प्रकारचे प्राणी असतील ते शेतात एकूण प्राणी किती ?

 

    स्पष्टीकरण-   

प्राण्यांची   संख्या=  14+20+12 = 46

  प्राण्याचे  प्रकार = 3 -1 = 2 ( म्हैस , शेळ्या, गाय  )

एकूण प्राणी  = 46 ÷ 2

         = 23

 

* एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे ,15 सोडून सर्व काळे, 09 सोडून सर्व लाल , चेंडू असतील तर त्या पिशवीत एकूण चेंडू किती आहेत ?

 

* एका पिशवीत 17 सोडून सर्व निळे ,13 सोडून सर्व काळे, 16 सोडून सर्व लाल ,20 सोडून सर्व पिवळे चेंडू असतील तर त्या पिशवीत पिवळ्या रंगाचे चेंडू किती आहेत ?.

 

*एका माळेत 10 सोडून सर्व काळे मणी आहेत 12 सोडून सर्व लाल मणी आहेत , 13 सोडून सर्व पांढरे मणी आहेत , 10 सोडून सर्व हिरवे मणी आहेत तर माळेत लाल रंगाचे मणी किती ?