वर्णमाला स्वाध्याय
1) मराठी भाषेचे लेखन आपण ..............लिपीत करतो.
1) अर्धमागधी 2) पाली 3) देवनागरी 4) मोडी
2) आपल्या तोंडावाटे
निघणाऱ्या मूळ ध्वनींना ................म्हणतात .
1) वर्ण 2) अक्षरे 3) व्यंजने 4) स्वरादी
3) मराठी भाषेत एकूण
...............वर्ण आहेत .
1) ३४ 2) 12 3) ५० 4) ४८
4) वाक्य म्हणजे
.............
1) शब्दसमूह 2)
क्रमाने आलेला अर्थपूर्ण अक्षरसमूह
3) विचार व्यक्त
करण्याचे साधन 4) विचार
पूर्णपणे व्यक्त करणारा शब्दसमूह
5)खालीलपैकी स्वरादी वर्णांची
जोडी कोणती ?
1) य – र 2) ओ -औ 3) अं – अ: 4)ऋ –लृ
6) खालीलपैकी सजातीय
स्वरांची जोडी कोणती ?
1) उ -अ 2)इ - उ 3) अ – इ 4)उ –ऊ
7) खालीलपैकी कोणता
दीर्घस्वर हा संयुक्त स्वर नाही ?
1) ऊ 2) ऐ 3) ओ 4) ए
8) खालीलपैकी विजातीय स्वरांची जोडी कोणती ?
1) अ-आ 2) ऋ –लृ 3) इ – ई 4)उ –ऊ
9) खालीलपैकी संयुक्त
स्वर कोणता ?
1) ऋ 2) आ 3) लृ 4) ए
10) मराठी भाषेतील
स्वतंत्र वर्ण कोणता ?
1) ऋ 2) ह 3) ळ 4) श्र
11) इ हा स्वर कोणत्या
प्रकारचा आहे ?
1) संयुक्त 2) ह्रस्व 3) दीर्घ 4) स्वरादी.
12) ह हा वर्ण कोणत्या
प्रकारचा वर्ण आहे ?
1) महाप्राण 2) उष्मा 3) अर्धस्वर 4) स्वतंत्र .
13) खालीलपैकी संयुक्त
स्वर कोणते ?
1) अ-आ 2) ओ –औ
3) इ – ई
4)अं–अः
14) सजातीय स्वरांची
जोडी कोणती ?
1) अ-इ 2) आ –ऊ 3) आ – ई 4)इ –ई
15) खालीलपैकी कोणता वर्ण
अर्धस्वर आहे ?
1) श 2) र 3) लृ 4) ञ
16) खालीलपैकी संयुक्त व्यंजन कोणते आहे ?
1) क्ष 2) ष 3) औ 4) व
17) मराठी भाषेत एकूण
किती व्यंजने आहेत ?
1) ३६ 2) ४८ 3) ३४ 4) ३२
18) ओ हा संयुक्त स्वर कोणत्या
दोन स्वरांनी बनलेला आहे ?
1) अ+ इ 2) आ+ उ 3) आ+ऊ 4) अ+उ
19) खालीलपैकी चुकीचा
पर्याय कोणता ?
1) ए= आ+ इ 2) औ=अ+ ऊ 3) औ=आ+ उ 4)ऐ= आ+ई
20) औ हा स्वर कोणत्या
प्रकारचा आहे ?
1) संयुक्त 2) ह्रस्व 3) दीर्घ 4) स्वरादी.